ओढाळ ते सुर्णे वैसे
1879.
ओढाळ ते सुर्णे वैसे विरहणी | तेथे काय गुणी प्रगटेल ॥१॥
देव खादले ते काय करी जाणा | सर्व अवगुण तयापासी ॥२॥
अवधी संतति काउळे पोशिले | जावोनि बैसले विष्टेवरी ॥३॥
भुजंगाचे मुखी अमृत घातले | फिरोनि पाहिले विषमय ॥४॥
नामा म्हणे ऐसे अभक्त निर्लज्ज | त्यासि केशिराज उपेक्षिना ॥५॥
