दृश्य तो जोगिळी देखण
1870.
दृश्य तो जोगिळी देखणे कवळी । दृष्टी ज्याचे मेळी समरस होय ॥१॥
लक्षालक्ष भेदी निरसी उपाधी । महाशून्य पदी पैठा होय ॥२॥
मन पवन गांठी संगम गोल्हाटीं । तूर्या औटपिठीं स्थिर करी ॥३॥
मनाचे उन्मन जनार्दनी खूण । यालागी शरण एकनाथ ॥४॥
