वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

भूमीचे मार्दव | सांग

🙏 4. संत नामदेव · ABH-081894 · अभंग क्र. १८८३

1883.
भूमीचे मार्दव | सांगे कोंभाची लवलव |तैसे आचार गौरव | सुकुलीनाचे ॥१॥
झाड जाणावे फुले | मानस जाणावे बोले |भोगे जाणावे केले | जन्मांतरींचे ॥२॥
लोभ जाणावा उभय दृष्टी | क्रोध जाणावा भोंवया गांठी |लटिका जाणावा बहु गोष्टी | नष्ट प्रकृति ओळखावा ॥३॥
द्वाही घातलिया जाणावा खरा | ढोकळ जाणावा कलिअवसरा |परद्वारिणी जाणावी उण्या उत्तरा | कुश्चळी घरोघरी हिंडतसे ॥४॥
मृदंग जाणावा गंभीर नादे | गाणे जाणावे सुस्वर शब्दे |ओंकार जाणावा अक्षरभेदें| शहाणा शब्द ओळखावा ॥५॥
विष्णुदास नामा करी विनंती | या उत्तराची न मानावी खंती |केशवाचा प्रसाद आहे माझे चित्ती | देवा काय करिसी ते न कळे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग