सुवर्ण आणि परिमळ | ह
1875.
सुवर्ण आणि परिमळ | हिरा आणि कोमळ |योगी आणि निर्मळ | हे दुर्लभ जी दातारा ॥१॥
देव जरी बोलता | तरी कल्पतरु चालता |गज जरी दुभता | हे दुर्लभ जी दातारा ॥२॥
धनवंत आणि दयाळु | व्याघ्र आणि कृपाळु |अग्नि आणि सीतळु | हे दुर्लभ जी दातारा ॥३॥
सुंदर आणि पतिव्रता | सावधान होय श्रोता |पुराणिक तरी ज्ञाता | हे दुर्लभ जी दातारा ॥४॥
क्षत्रिय आणि शूर भला | चंदन फुल फुलला |स्वरूपी गुण आथिला | हे दुर्लभ जी दातारा ॥५॥
ऐसा संपूर्ण सर्व गुणी | केवी पाविजे शारंगपाणि |विष्णुदास नामा करी विनवणी | मुक्ति चरणी त्याचिया ॥६॥
