वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

भोग द्यावे देवा । त्

🙏 3. संत तुकाराम · ABH-080400 · अभंग क्र. १८६९

1869.
भोग द्यावे देवा । त्याग भोगींच बरवा ॥१॥
आपण व्हावे एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥धृपद॥
योजे यथाकाळे । उत्तम पाला कंदे मूळे ॥२॥
वंचकासी दोष । तुका म्हणे मिथ्या सोस ॥३॥

अर्थ :
कोणतेही भोग प्रथम देवाला समर्पण करावेत, नंतर आपण भोगावेत ; म्हणजे त्या भोगातच उत्तम रीतीने त्याग घडतो, आपण त्या भोगापासून अलिप्त राहावे आणि देवाला त्याचा भोक्ता करावे. म्हणजे या देहातच देवाची प्राप्ती होते. ज्या ऋतूमध्ये जी कंदमुळे आणि जो पाला आपल्याला मिळत असेल, ते सर्व उत्तम मानून त्याचा देवाला समर्पण करण्याकडे विनियोग करावा. तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य देवाला समर्पण न करता भोग भोगतो, तो वंचक असून त्याला पाप लागते ; म्हणून त्याचा देवाला समर्पण न करण्याचा आग्रह वाईट आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग