वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

प्रेम तेथे वास करी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080208 · अभंग क्र. १८९०

1890.
प्रेम तेथे वास करी । मुखी उच्चारिता हरी ॥१॥
प्रेमे यावे तया गावा । चोजवी तया वैष्णवा ॥धृपद॥
प्रेमे पाठी लागे बळे । भक्त देखोनिया भोळे ॥२॥
प्रेम न वजे दवडिता । शिरे बळे जेथे कथा ॥३॥
तुका म्हणे थोर आशा । प्रेमा घरी विष्णुदासा ॥४॥

अर्थ :
अर्थ : :–जेथे मुखाने हरिनामाचा अखंड उच्चार केला जातो, तेथे हरीविषयक प्रेम वास्तव्य करते. कारण, प्रेम हे हरिभक्त जेथे राहतात, त्या गावाचा शोध काढीत तेथे येऊन राहते, आणि भाविक भक्त पाहून त्यांच्या पाठीशी बळेच लागते. जेथे हरिकथा चालू असते, तेथे ते प्रेम बळेच प्रवेश करते ; आणि त्याला बाहेर घालविले तरी ते जात नाही. असे ते निलाजरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्तांच्या घरी आपल्याला आश्रय मिळेल अशी त्या प्रेमाला फार आशा वाटते ; म्हणून प्रेम त्यांच्या घरी आपण होऊन येते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग