वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

बेडुक म्हणिजे चिखलाच

🙏 4. संत नामदेव · ABH-081909 · अभंग क्र. १८८२

1882.
बेडुक म्हणिजे चिखलाचा भोक्ता | क्षीर सांडूनि रक्ता गोचीड झोंबे ॥१॥
जयाची वासना तयासिच गोड | प्रेमसुख चाड नाही त्याला ॥२॥
वांझ म्हणे मी वाढविते जोंजार | उघडावया कवाड नाही कोणी ॥३॥
अस्वलाशी तेल माखियले कानी | ते म्हणे रानी थोर सुख ॥४॥
श्वानाचिया कानी खोविली लेखणी | ते घेत असे घाणी घरोघरी ॥५॥
गाढवासी लाविली तूप पोळी डाळ | भुंके आळोआळ लाज नाही ॥६॥
सूकरा कस्तुरी चंदन लाविला | तो तेथोनि पळाला विष्टा खाया ॥७॥
नामा म्हणे माझी वासना हे खोटी | दृढ धरिली मिठी विठ्ठल पायी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग