वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

भुजंग विखार करी पवना

🙏 4. संत नामदेव · ABH-081916 · अभंग क्र. १८६९

1869.
भुजंग विखार करी पवनाहार | परि तो योगेश्वर म्हणू नये ॥१॥
पवनाच्या अभ्यासे कायाचि पालटी | परि तो वैकुंठी सरता नव्हे ॥२॥
शुद्ध करी मन समता धरी ध्यान | तरिच भवबंधन तुटेल रे ॥३॥
पवित्र गंगाजळ मीन सेवी निर्मळ | परि दुष्ट ते केवळ कर्म त्याचे ॥४॥
अवचिता तो हे सांपडला गळी | न सुटे तयेवेळी तीर्थोदके ॥५॥
घर सांडोनिया वन सेविताती | वनी का नसती रीस व्याघ्र ॥६॥
काम क्रोध लोभ न संडवे मनी | असोनिया बनी कोण काज ॥७॥
बहुरुप्याचा नटा माथा भार जटा | भस्म राख सोटा हाती दंड ॥८॥
धोति-पोति कर्मावेगळाचि दिसे | हुंबरत असे अंगवळे ॥९॥
त्रिपुंड टिळे अंगी चंदनाची उटी | घालोनिया कंठी तुळसीमाळा ॥१०॥
व्यापक हा हरी न धरिती चित्ती | लटिकी याची गति गातु असे ॥११॥
'मनाते तू मुंडी देहभाव सांडी | राखिसी तरी शेंडी हेंचि कर्म ॥१२॥
मन है दर्पण करोनि निर्मळ | पाहे पा केवळ आत्मसोये ॥१३॥
तुझा तू केवळ तुजमाजी पाही | नामा म्हणे घ्यायी केशिराज ॥१४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग