वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

पायाच्या प्रसादे । क

🙏 3. संत तुकाराम · ABH-080226 · अभंग क्र. १८७०

1870.
पायाच्या प्रसादे । काही बोलिलो विनोदे ॥१॥
मज क्षमा करणे संती । नव्हे अंगभूत युक्ती ॥धृपद॥
नव्हे हा उपदेश । तुमचे बडबडिलो शेष ॥२॥
तुमचे कृपेचे पोसणे । जन्मोजन्मी तुका म्हणे ॥३॥

अर्थ :
संत हो, तुमच्या पायाच्या कृपेने मी जे काही लडिवाळपणाने बोललो आहे ; याबद्दल तुम्ही संतांनी मला क्षमा करावी. मी जे काही बोललो, त्यात माझ्या अंगचा शहाणपणा नाही, तर तो तुमचा आहे. हा माझा उपदेश नसून तुमच्यापासून जे काही ऐकिले ; तेच उच्छिष्ट शब्द मी कसेतरी बडबडलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संतहो, मी जन्मोजन्मी तुमच्या कृपेचे पोसले जाणारे मूल आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग