वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

परब्रह्मा प्राप्तीला

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084632 · अभंग क्र. १८८३

1883.
परब्रह्मा प्राप्तीलागीं । कर्मे आचरावी वेगी ॥१॥
चित्त शुद्ध तेणे होय । भेटी सदगुर्चे पाय ॥२॥
कर्म नित्य नैमित्तिक । प्रायश्चित जाण एक ॥३॥
उपासन ते चवथे । आचरावें शुद्ध चित्ते ॥४॥
तेणे होय चित्त स्थिर । ज्ञानालागीं अधिकार ॥५॥
होय भेटी सदगुरुची । ज्ञानप्राप्ति तैंचि साची ॥६॥
प्राप्त झाल्या ब्रह्माज्ञान । आपण जग ब्रह्मा परिपूर्ण ॥७॥
एका जनार्दनी भेटला । ब्रह्मास्वरुप स्वये झाला ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग