गुरुमुखें घेता तो नि
1879.
गुरुमुखें घेता तो निर्दोष । येर्हर्वीं आयास पडे कष्ट ॥१॥
राम कृष्न हरिमंत्र हा सोपा । उच्चारिता खेपा खंडे कर्म ॥२॥
तुटती भावना द्वैताची ते बुद्धि । निरसे उपाधि कामक्रोध ॥३॥
एका जनार्दनी सत्य सत्य साचा । रामनाम मंत्रांचा जप करी ॥४॥
