आदि गुरु शंकर ब्रह्म
1897.
आदि गुरु शंकर ब्रह्माज्ञान खूण । बाणली पै पुर्ण मत्स्येंद्रनाथी ॥१॥
मत्स्येंद्र वोळला गोरक्ष बोधिला । ब्रह्माज्ञान त्याला कथियेले ॥२॥
गोरक्ष संपुर्ण निवेदिलें गहिनी । तेणे निवृत्तिलागुनी उपदेशिलें ॥३॥
निवृत्तिनाथे ज्ञानदेवासी दिधले । परंपरा आले ऐशा परी ॥४॥
एका जनार्दनी तयाचा मी दास । उच्छिष्ट कवळास भक्षीतसे ॥५॥
