वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

जाऊ देवाचिया गावा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079978 · अभंग क्र. १८८९

1889.
जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ॥१॥
देवा सांगो सुखदुःख । देव निवारील भूक ॥धृपद॥
घालू देवासीच भार । देव सुखाचा सागर ॥२॥
राहो जवळी देवापाशी । आता जडोनि पायासी ॥३॥
तुका म्हणे आम्ही बाळे । या देवाची लडिवाळें ॥४॥

अर्थ :
चला, आपण देवाच्या गावाला - पंढरीला जाऊ ; तो आपल्याला विश्रांती देईल. देवाजवळ आपली सुखदुःखे सांगू ; म्हणजे तो आपली तळमळ दूर करील. देवावरच संसाराचा भार घालू, कारण देव सुखाचा सागर आहे. याकरिताच देवाच्या पायाशी जडून राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाची लडिवाळ मुले आहोत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग