निरालंब देशींचा गुरु
1878.
निरालंब देशींचा गुरुराया । धरें का रे भाव चरणकमळीं ॥१॥
धरितांचि भाव नासतसे माया । त्यांचे स्वरुप ठाया वोळखावें ॥२॥
भाव अभावा विरहित साचे । ते रुप जयाचे हृदयी ध्यावें ॥३॥
एका जनार्दनी ऐसे जे रुपडें । हृदयी चोखडे ध्याई जना ॥४॥
