नानापरिची दैवते | बह
1895.
नानापरिची दैवते | बहुत असती असंख्याते |सेंदुर शेरणी जे इच्छिते | ते काये आर्त पुरविते ॥१॥
अंध नको होऊ आलीया | भजे भजे पंढरिराया |सोडू नको विष्णु त्रिरात्र पारणिया | तोंडी कुलुप पाठी गळ टोचोंनिया ॥२॥
नाना धातूंची प्रतिमा केली | षोडशोपचारे पूजिली |दुकळी विकुनि खादली ते काय आत पुरविती ॥३॥
आता दृढ धरोनिया भाव | वोळगा वोळगा पंढरिराव |आपुले चरणी देईल ठाव | विष्णुदास नामा म्हणे ॥४॥
