वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

मुळीच निर्विकार ब्रह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084649 · अभंग क्र. १८६८

1868.
मुळीच निर्विकार ब्रह्मा ते निश्चळ । त्यामाजीं चंचळ अहंस्फूर्ति ॥१॥
तेचि ज्ञप्तीकळा चिन्मात्र स्वरुप । तो हरी संकल्प पुरातन ॥२॥
संकल्पी कल्पेन तेचि मूळ प्रकृती । जन्म अव्यक्त ती माया पोटी ॥३॥
तेथोनी हिरण्यगर्भ ते जन्मले । तया पोटा आले विराट पै ॥४॥
गुणभूत देह होतो माये पोटी । तत्त्वज्ञान पाठी विस्तारले ॥५॥
स्थळा पासोनियां मुळाकडे जावे । सर्वसाक्षी व्हावे स्वयंब्रह्मा ॥६॥
सदगुरुचा तो पै जालिया प्रसाद । एकाजनार्दनी बोध ठरावे तो ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग