वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

अंतरी आवेश धरुनी काम

🙏 4. संत नामदेव · ABH-081915 · अभंग क्र. १८८४

1884.
अंतरी आवेश धरुनी कामाचा | लटकी जल्पे वाचा शब्दज्ञाने ॥१॥
बोलाचे पे मांडे क्षीर घारी अन्न | तेणे समाधान केंवि होय ॥२॥
बोलिल्यासारिखे न करी पामर | वृथाचि कुरकुर वाढविली ॥३॥
नाही जीव तया प्रेता आलिंगन | तैसे ते श्रवण केल्या होय ॥४॥
नामा म्हणे त्याच्या संगे स्थिति दूषे | जाला लाभ नासे तेथे जाता ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग