वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

हरिदासपणे उभविला ध्व

🙏 4. संत नामदेव · ABH-081928 · अभंग क्र. १८८९

1889.
हरिदासपणे उभविला ध्वज | परि तो वर्म बीज न कळेची ॥१॥
काय करू देवा जळो याची बुद्धि | जोंवरी नाही शुद्धि परलोकाची ॥२॥
मुद्रा धारण अंगी गळा तुळसिमाळा | परी नाही जिन्हाळा स्वहिताचा ॥३॥
धरी बहु वेष वृथा करी दोष | नाम ब्रह्मरस अंगी नाही ॥४॥
दुसरा हरिदास देखोनिया रंगी | धांवोनिया वेगी ग्रासो पाहे ॥५॥
दुसरियाचे पद ऐकोनिया कानी | क्रोधे पेटे वन्हि पर्वतींचा ॥६॥
दुर्जनाचे भये पळती साधुवृंदे | जैसी ती श्वापदे व्याघ्रा भेणे ॥७॥
बोले नानायुक्ति वश करी सभा | दुसरा रंगी उभा राहो नेदि ॥८॥
राजमाने श्रेष्ठ मोठे अधिकारी | त्यापुढे कुसरी करिताती ॥९॥
धातमात करी नटे नानापरी | चंचळ परनारी भुलवितो ॥१०॥
ऐसे नाम विटंबुनि करील जो हरिकथा | तेणे परमार्थ विघ्न केले ॥११॥
जाई जुई उत्तम सुगंध कस्तुरी | विष्ठेच्या दाथरी आंथुरिला ॥१२॥
साडेपंधरा सोने होते पालवण्या | परि झाले हीण डाक लागे ॥१३॥
द्यावे दिव्यौषध रोगियाचे हिता | केलिया कुपथ्या वाया जाय ॥१४॥
चतुविध अन्न षड्रस पक्वान्न | विटाळले जाण श्वानमुखे ॥१५॥
ऐसे म्हणता माझी मळेल पै वाचा | परि हा वैष्णवांचा धर्म नव्हे ॥१६॥
संसार-सागरू हरिकथा तारू | तरिजे हा विचारू दुरी ठेला ॥१७॥
जे कथा ऐकत्ती पसरोनि बाह्या | शांति क्षमा दया येती तेथे ॥१८॥
शांति क्षमा दया येती भेटावया | तेथे मोक्ष व्हावया विलंब काय ॥१९॥
आनंद नामाचा ऐकूनि गजर | ब्रह्मादिक हरिहर येती तेथे ॥२०॥
खुटला अनुवाद मावळला शब्द | अनिर्वाच्य बोध प्रगटला ॥२१॥
बैकुंठ मांडून धांवे चक्रपाणि | कीर्तनाचा ध्वनि ऐकुनिया ॥२२॥
तेथे श्रोते वक्ते होतील निष्पाप | ऐशी पुण्यरूप हरिकथा ॥२३॥
शून्यांचे निजशून्य जेथे हरपले | एकाग्र मन जाले ध्यान तेथे ॥२४॥
नामा म्हणे माझी हरिकथा माऊली | मोक्ष पान्हा घाली भक्तालागी ॥२५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग