वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

सावली पिळुनि का घालि

🙏 4. संत नामदेव · ABH-081886 · अभंग क्र. १८८५

1885.
सावली पिळुनि का घालिशी | मुद्रेने आंग का जाळिसी ॥१॥
कासया केली खोडी | काया विटंबिली बापुडी ॥२॥
कावळा प्रातः स्नान करी | जिते मेले ते न विचारी ॥३॥
मंदे लावूनि द्वादश टिळे | फासा घालूनि निवटी गळे ॥४॥
सुसरी गंगे रहिवासु | बहुता जीवाते करी ग्रासु ॥५॥
गंगे गेल्या ज्ञान सांगे | मांजर मारिले ते न सांगे ॥६॥
बक ध्यान लावुनि टाळी | मौन धरुनि मासा गिळी ॥७॥
नामा म्हणे केशिराजा | ऐशिया जीवा लावी बोजा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग