बहुत दाविती खुणा । आ
1884.
बहुत दाविती खुणा । आमुच्या नये त्या मना । आजी आला पाहुणा । गुरुराव ॥१॥
सांगे बोधाचिया गोष्टी । म्हणे का रे होता कष्टी । या संसाराची तुटी । करा करा लवलाहे ॥२॥
का रे होता उगेच उदास । आशा मोह तोडा पाश । का रे कासावीस । होता वाउगे परदेशी ॥३॥
धरा धरा मंत्र मुखी । जेणे शिवादिक जाहलें सुखी । तुमचे तुम्हा न कळे शेखी । वाउगें का शिणतां ॥४॥
अरे नको वेरझारा । चुकवा जन्ममरणा सारा । एका जानर्दनीं म्हणे । धरा विश्वास संतवचनीं ॥५॥
