बुजगावणे शेती माणसे
1881.
बुजगावणे शेती माणसे म्हणती | काय त्याचे हाती शस्त्र शोभे ॥१॥
हंसासी विरोध करीत कावळा | नेणे त्याची कळा उंचपणे ॥२॥
अनामिकासंगे पाठविता पंडिता | तो तयाते तत्त्वता काय जाणे ॥३॥
नामा म्हणे बापा करू नको तैसे | विचार कायसे पाहसील ॥४॥
