श्रीगुरुपायीं ठेवींत
1888.
श्रीगुरुपायीं ठेवींतुं विश्वास । दासाचा तुं दास होय त्यांच्या ॥१॥
परब्रह्मा राम वसिष्ठा शरण । कृष्णें संदीपन गुरु केला ॥२॥
वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी । वंद्य त्रिभूवनीं झाला वाल्हा ॥३॥
एका जनार्दनी गुरु मज भेटला । मोकळा दाविला मार्ग तेंणे ॥४॥
