गोडी वेगळा ऊंस वाढे
1887.
गोडी वेगळा ऊंस वाढे । हे तो न जोडे कल्पांती ॥१॥
जों जों वाढे तो तो गोड । ऐशी चाड भावाची ॥२॥
जों जों धरिशील भाव । तो तो देव दिसे पुढे ॥३॥
ही तो प्रचीति घ्या अंगी । नाचा रंगी संतांच्या ॥४॥
रुपावेगळी ती छाया । एका जानर्दनीं लागे पायी ॥५॥
