बोलणे त्याचे ते नि:श
1352.
बोलणे त्याचे ते नि:शब्द ।
देखणे देखती सच्चिदानंद ।
करणे चाळिता आत्मबोध ।
विषयी विषय बहमरुप ॥१॥
जाणे येणे आणिका दिसे ।
अचळपणे ते जैसे तैसे ।
कल्लोळ सागरी उससे ।
रश्मि जैसे निजबिंबी ॥२॥
न मोडे त्या अखंडता ।
घेता देता सर्वही करिता ।
हासता खेळता बोलता ।
निजी निजता यथासुखे ॥३॥
लेणी अळंकारहि मिरविती ।
जयापरि तैसेचि दिसती ।
न मोडता स्वरुपस्थिति ।
चित्ती चितंन सर्वदा ॥४॥
निळा म्हणे गुणातीत ।
देही देहाते नातळत ।
होऊनिया ठेले संत ।
अंखटित अखंडी ॥५॥
