उद्विग्न मनी करी दीघ
1365.
उद्विग्न मनी करी दीघ ध्वनी | नाही माझे कोणी सखे ऐसे ॥१॥
वैराग्य कसवटी सोसवेना घाये | पळावया पाये मार्ग काढी ॥२॥
जाले चाळाचूळ मनांत चंचळ | युगा ऐसे पळ वाटतसे ॥३॥
नामा म्हणे जावे पळोनिया आता संतसंग होता भाजतील ॥४॥
म्हणे मुक्ताबाई चंतन्याचा कर ब्रह्म अग्नीवर चेतवावा ॥५॥
