संत पाहुणेरा सज्जनाच
1353.
संत पाहुणेरा सज्जनाचे घरी पूजा करिता वरी डोई काढी ॥१॥
करिता सन्मान अंगी भरे ताठा देवा मे करंटा असुनी काय ॥२॥
अहंता हा खुंट वाढविला चित्ती | न साहे संगती सज्जनाची ॥३॥
पंढरीचे भूषण सांगतो जनांसी | नाही या मनासी तीळ बोध ॥४॥
म्हणे मुक्ताबाई चांगदेवा वाणी | भजावा सज्जनी नामदेव ॥५॥
