उठले निवृति संतांच्य
1344.
उठले निवृति संतांच्या दरुशना | पंढरीचा प्रेमा घरा आला ॥१॥
केली प्रदक्षिणा वंदिले चरण | जाला अभिमान नामवासी ॥२॥
देवाचे जवळी आम्ही निरंतर यासी अधिकार नमस्कारा ॥३॥
नित्य समागम हरिच्या चरणी हे आणि आम्ही देवभक्त ॥४॥
नामा म्हणे कांये वंदू यांचे चरण अंगे परब्रह्म मजपाशी ॥५॥
