निवृत्तिदेव म्हणे ऐस
1355.
निवृत्तिदेव म्हणे ऐसे म्हणा नये | धन्य भाग्ये पाहे संत आले ॥१॥
आपुले स्वहित करावे आपण | मतांच्या सन्माना चुको नये ॥२॥
धन्य हो ते नर राहाती पंढरी श्वान त्यांचे घरी सुखे व्हावे ॥३॥
नामदेवा संगे देवाचा हो वोढा | प्रेमे केला वेडा पांडुरंग ॥४॥
निवृत्ति म्हणे त्यांसी न म्हणे आरे तुरे बाई ठेविता बरे डोई माते ॥५॥
म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण | आपणा दर्शन नलगे त्याचे ॥६॥
