जोहारियाचे पुढे मांड
1363.
जोहारियाचे पुढे मांडियेले रत्न | आता मोला उणे येईल कैसे ॥१॥
तैसे थापटणे पारखियाचा हात | वाफ जाल्या घात वाया जाती ॥२॥
प्रथम थापटणे निवृत्तीच्या माथा | डेरा जाला निका परब्रह्म ॥३॥
तेंचि थापटणे ज्ञानेश्वरावर | आता कैचे कोरे उरे येथे ॥४॥
तेंचि थापटणे सोपानाचे डोई | यांत लेश नाही कोरे कोठे ॥५॥
तेंचि थापटणे मुक्ताबाईला हाणी अमृत संजिवनी उतु आली ॥६॥
तेंचि थापटणे नामदेवावर डोई चोळू मोहरे रडो लागे ॥७॥
गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई सुन्नेभरि नाही भाजियेला ॥८॥
