संतसमागम फळला रे मला
1364.
संतसमागम फळला रे मला | सन्मानाचा जाला लाभ मोठा ॥१॥
अतीथि आदर केला मुक्ताबाई | लांकडाने डोई फोडिली माझी ॥२॥
देवाने गोंधळ घातला गरुडपारी भिजली पितांबरी अश्रुपाती ॥३॥
माझे माझे म्हणोनि गाईले गान्हाणे | कळले संतपण हेंचि तुमचे ॥४॥
भरी भरोनिया आलो तुम्हा जवळी | कैकाड मंडळी ठावी नोव्हे ॥५॥
नामा म्हणे सन्मान पावलो भरून करिता गमन बरे दिसे ॥६॥
