निवृती ज्ञानदेव सोपा
1348.
निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई | म्हणती ज्ञान कायी कथुनिया ॥१॥
भक्तीचिया बळे देव पै जिंकिला | ऋणाईत केला कैसा येणे ॥२॥
धन्य ते भाविक नामा आणि कबीर | रोहिदास चांभार बहिरा पिसा ॥३॥
त्यांची पायधुळी वंदिता कपाळी | वंशही समूळी उद्धरती ॥४॥
नामा म्हणे मुक्ताबाई ऐका स्पष्ट |भक्तीहुनी श्रेष्ठ आणिक नाही ॥५॥
