उसाचे सेजारी येरंडाच
1352.
उसाचे सेजारी येरंडाचे झाड | नाही त्याचा पाड गोडी आली ॥१॥
कर्पुरासी जाला दीपाचा शेजार | काय गुणे सार राहिल त्याचा ॥२॥
सागरी लवण टाकिले नेऊन काय गुण खडेपण उरले त्याचे ॥३॥
तैसा नामदेव विठोबाच्या जागा काय गुणे या गा कोरेपण ॥४॥
म्हणे मुक्ताबाई चंदनाचे झाड | अहंतासर्प वेढे गुंडाळिले ॥५॥
