हांसोनि सोपाने खुणाव
1362.
हांसोनि सोपाने खुणावित्या खुणा | नामदेव पाहुणा आला असे ॥१॥
तयासी हो पाक पाहिजे पवित्र | भाजले की कोरे कळो नेदी ॥२॥
मुक्तिकेचे पारखी तुम्ही आहा देवा | भाजुनि जीवा शिवा ब्रह्म करा ॥३॥
आनंदे डुल्लती करावरी कर | नेशो राहिले कोरे कोण्या गुणे ॥४॥
निर्गुणापासोनी सगुणाची संगती | नाही स्वरूपस्थिति गंगा आली ॥५॥
म्हणे मुक्ताबाई हेरोनिया हेरा | हिरा किंवा गारा नेणो बापा ॥६॥
