परस्परे गुह्य करिती
1361.
परस्परे गुह्य करिती भाषण | म्हणती महाधन गांवा आला ॥१॥
रक्त श्वेत पीत नीळ वर्णाकार | नक्षत्रांची वर पूजा केली ॥२॥
श प्रकाशमय तत्त्व ज्योतिर्मय पहाणे | दीप त्रिभुवनी एक जाला ॥३॥
निवृत्तिदेव म्हणे कुलालाचे चक्र | अंतर बाहेर एक ऐसे जाले ॥४॥
