गोरा जुनाट पे जुने |
1358.
गोरा जुनाट पे जुने | हाती थापटणे अनुभवाचे ॥१॥
परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी | वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥२॥
सोह शब्द विरक्ति डवरली आंतरी | पाहाता आंबरी अनुभव ॥३॥
म्हणे मुक्ताबाई घालू या लोटांगण | जाऊ द्या शरण अव्यक्तासी ॥४॥
