कुलालाचे कुंभ भाजल्य
1356.
कुलालाचे कुंभ भाजल्याविण माती | काय आहे संगती पाणियाची ॥१॥
मेणाची पुतळी घेता करी बरी | अग्निचे शेजारी राहे कैशी ॥२॥
तैसा अधिरासी काय संतसंग | मृगजळा तरंग येतील कैसे ॥३॥
ते आजि नवल देखियेले डोळा | दगड जैसा जळा वेगळेपण ॥४॥
म्हणे मुक्ताबाई जाऊ ;देऊ नये | ऐसे सरिसे काय भांडे करा ॥५॥
