वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 16. तीर्थ महात्म्य अभंग › ४. पंढरपूर महात्म्य संक्षिप्त माहितीसह

नामदेव पायरी...

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073560 · अभंग क्र. १३६३

1363. नामदेव पायरी...
वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य पूर्ण झाले तेव्हा संत नामदेव महाराजांनी विठ्ठलापाशी संजीवन समाधी घेण्याची इच्छा प्रकट केली. जेव्हा ही गोष्ट त्यांच्या परिवाराला समजली, तेव्हा आई, वडील, मुले आणि सुना यांनी त्यांच्यासमवेत समाधी घेण्याचे ठरविले. शके १२७२ आषाढ वद्य त्रयोदशी दिवशी संत नामदेव महाराजांसह त्यांच्या परिवारातील चौदाजणांनी संजीवन समाधी घेतली. संत नामदेवांनी पायरीची जागा का निवडली तर विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या संतांची चरण धूळ आपल्या अंगावर पडावी ही त्यामागील शुद्ध भावना होती म्हणून त्यांनी मंदिरा बाहेरील पायरीपाशी संजीवन समाधी घेतली कि जी आज नामदेव पायरी म्हणून प्रसिद्ध आहे भाविक प्रथम नामदेव पायरीचे दर्शन घेतात आणि मग विठ्ठल दर्शनला मंदिरात जातात.

विठ्ठल मूर्ती.
वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेनुसार विठ्ठलाची मूर्ती ना बसवली आहे, ना घडवली आहे तर ती स्वयंभू आहे. मात्र मूर्ती विज्ञान अभ्यासक ग. ह. खरे यांच्या मते मूर्ती पाचव्या शतकातील असावी. त्याबाबत एकमत नाही. आक्रमणाच्या वेळी ही मूर्ती काढून सुरक्षित ठिकाणी ठेऊन बडव्यांनी पुन्हा बसवली आहे. मूर्ती समचरण आहे देवाने कमरेवर दोन हात ठेवले आहेत कारण हा संसाररूपी भवसागर भक्तांसाठी कमरे एवढा आहे हे सांगण्यासाठी देवाने कमरेवर हात ठेवले आहेत अशी कल्पना शंकराचार्य यांनी केली आहे. कंठहार, मस्यकुंडले, डोक्यावर किरीट आहे आणि जो महादेवाच्या पिंडीसारखा आहे अशी आख्यायिका सांगितली जाते कि भगवान शंकर विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले तेव्हा मस्तकावर विराजमान झाले हातात कमळ आहे कारण कृष्ण अवतारात दैत्यांचा संहार केल्यानंतर कृष्णाने शस्त्रे खाली ठेवली कृष्णाचा दुसरा अवतार म्हणजे पांडुरंग त्यामुळे कृष्णाने भक्तांच्या स्वागतासाठी कमळ हातात घेतले आहे पांडुरंगाची मूर्ती सुंदर आहे म्हणून देवाला मदनाचा पुतळा म्हंटले जाते.

विष्णुपद
पंढरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर चंद्रभागा नदी पात्रात विष्णुपद मंदिर आहे अशी आख्यायिका सांगितली जाते कि पंढरपूर अस्तित्वात येण्याआधी इथे गयासुर नावाचा राक्षस राहत होता जो तपस्वी होता त्याच्या दर्शनाने अबाल वृद्ध महापातकी यांचा उद्धार व्हायचा त्यामुळे यमलोकी कोणी जात नसे यावर यमाने देवाकडे याचना केली कि अस होत राहिले तर यमलोकी कोणीही येणार नाही त्यावर ब्रह्मदेवाने विष्णूच्या मदतीने गयासुराला पाताळात गाढले त्यामुळे जिते विष्णू चरणाचा स्पर्श झाला ते विष्णुपद तसेच इथे कृष्णचरण आहेत माता रुक्मिणी रुसून पंढरपुरा आली तेव्हा तिला शोधात आलेल्या कृष्णानी इथे गोपाळकाल केला बासरी वाजवली म्हणून कृष्णचरण पाहायला मिळतात ज्ञानोबा माउलीने संजीवन समाधी घेतली तेव्हा व्यथित होऊन भगवान पांडुरंग मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदाला वास्तव्यासाठी आले त्यामुळे आजही मार्गशीर्ष महिन्यात देवाचे वास्तव्य विष्णुपदाला असते असे मानले जाते मंदिरातील सर्व नित्योपचार मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदावर केले जातात या सर्व कारणांमुळे भाविक भक्तांच्या दृष्टीने विष्णुपदाचे अनन्य साधारण महत्व आहे म्हणूनच भाविक दर्शनाकरित न चुकता विष्णुपदला येतात.

पंढरी सार समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग