न पुसता संता निघाला
1367.
न पुसता संता निघाला तेथुनी | पैलपार इंद्रायणी प्राप्त जाला ॥१॥
मार्गे पुढे पाहे पळत तांतडी | आला उठाउठी पंढरिसी ॥२॥
कळवळोनि कंठी धरिली विठल मूर्ती | नको देऊ हाती निवृत्तीच्या ॥३॥
ज्ञानदेव सोपान बोलाविला गोरा | जुनाट म्हातारा जाळू आला ॥४॥
मुक्ताईने तेथे माजविली कळी | हे संत मंडळी कपटी तुझी ॥५॥
नामा म्हणे देवा आणिले पूर्व देवे | गेलो असतो जीवे सगळाची ॥६॥
