वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

देवासी तो पुरे एकभाव

🙏 3. संत तुकाराम · ABH-079007 · अभंग क्र. १३६५

1365.
देवासी तो पुरे एकभाव गाठी । तोचि त्याचे मिठी देईल पायी ॥१॥
पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनिया ॥धृपद॥
काही नेघे शिरी निमित्ताचा भार । न लगे उत्तर वेचावेचि ॥२॥
तुका म्हणे जीवे पडिलिया गाठी । मग नाही मिठी सुटो येत ॥३॥

अर्थ :
देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकनिष्ठ भक्तिभाव असणे हे पुष्कळ आहे आणि त्यानेच देवाच्या पायाला मिठी देणे शक्य होईल. मी माझ्या देहापासून वेगळा होऊन या जगाला कौतुकाने पाहत आहे. मी माझ्या शरीरावर कोणत्याही निमित्त चा भार घेणार नाही आणि त्याविषयी कोणी काही विचारले तर मी काहीच उत्तर देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात एकदा कि देवाची आणि जीवाची गाठ झाली कि मग ती काही केल्या सुटणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग