उठले ज्ञानेश्वर केले
1345.
उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन | मस्तकी चरण नमस्कारिले ॥१॥
नामा म्हणे आम्हा वडिल अधिकारू | यासाठी नमस्कारू योग्य आहे ॥२॥
आम्ही देवापाशी असतो सर्वकाळ | येऊनी सकळ वंदिताती ॥३॥
वैष्णवांचे भार देव सुरगण येताती शरण पंढरिसी ॥४॥
नामा म्हणे आता पाहिली मंडळी | यासाठी वनमाळी स्फुंदू लागे ॥५॥
