वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 166. गोणाई व नामदेव यांचा संवाद

माता म्हणे नामा राऊळ

🙏 4. संत नामदेव · ABH-082789 · अभंग क्र. १२५८

1258.
माता म्हणे नामा राऊळाक्षी खेळता | तुज कोण्या दैवता ओढियले ॥१॥
लाजिरवाणे नाम्या तुवा केले जिणे | हांसती पिशुने देशोदेशी ॥२॥
सांडि देवपिसे नको करू ऐसे | बळे घर कसे बुडविसी ॥३॥
जन्मा येऊनिया पराक्रम करी | का होसी संसारी भूमिभार ॥४॥
सुदैवाची लेंकरे वर्तताति कसी | तू मज जालासि कुळक्षय ॥५॥
कसी तुज नाही लौकिकाची लाज | हेंचि थोर मज नवल वाटे ॥६॥
अभिमान अहंता सांडुनिया जगी | नाचतोसि रंगी गीत गाता ॥७॥
तुजविण लोक अज्ञान नसती | क्षण न विसंबती मायबापा ॥८॥
|पुत्र आणि कलत्र घराची विपत्ति | तुज अभाग्याचे चित्ती पंढरीनाथ ॥९॥
याते भजती त्याचे न उरेचि कांही | हाचि देव पाही घरघेणा ॥१०॥
जयाचे खुंटे तो लागे याच्या पंथे | तुजसि शिकविते म्हणोनिया ॥११॥
गोणाई म्हणे नाम्या हे नव्हे पै भले | विठोबाने केले आपणा ऐसे ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग