संतांचे वर्णन
1257.
संतांचे वर्णन
अगाध कीर्ति वाढले संत ।
केली विख्यात चरित्रे ही ॥१॥
अग्नींत उभे विषचि प्याले ।
नाही ते भ्याले महा शस्त्रा ॥२॥
वंदूनि आज्ञा बोले पशु ।
करी श्रुतिघोषु दीर्घ स्वरे ॥३॥
निळा म्हणे ठेऊनि उदकी ।
कागदहि सेखी कोरडया वह्या ॥४॥
