वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

ज्या नामे पाषाण जळां

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086564 · अभंग क्र. १२६०

1260.
ज्या नामे पाषाण जळांत तरलें । नाम त्या रक्षिलें प्रल्हादासी ॥१॥
अग्नि विष बाधा नामेंचि निवारीं । गिरीं आणि कंदरें रक्षी नाम ॥२॥
ब्रह्महत्यारी वाल्हा नामेंचि तरला । त्रैलोकीं मिरवला बडिवार ॥३॥
एका जनार्दनी नामेंचि तरलें । जडजीव उद्धरिले युगायुगीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग