वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

आमुचिया भावे तुज देव

🙏 3. संत तुकाराम · ABH-079297 · अभंग क्र. १२५७

1257.
आमुचिया भावे तुज देवपण । ते का विसरोन राहिलासी ॥१॥
समर्थासी नाही उपकारस्मरण । दिल्या आठवण वाचोनिया ॥धृपद॥
चळण वळण सेवकाच्या बळे । निर्गुणाच्यामुळे सांभाळावे ॥२॥
तुका म्हणे आता आलो खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावे ॥३॥

अर्थ :
देवा आमच्या भक्ती भावामुळे तुला देवपणा आले आहे. हे देवा तू विसरून गेला आहेस की काय ? श्रीमंत लोकांना केलेल्या उपकाराची जाणीव तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्यांना आठवण करून देण्यात येत नाही. आम्ही तुझे सेवक आहोत आणि आमच्या भक्तिभावानेच निर्गुणाच्या ठिकाणी तुला अवतार घेण्याच्या चलन-वलनात्मकक्रिया होतात, त्यामुळे तुझे सगुण रूप सांभाळले जाते. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी मी आता अट्टाहासावर आलेलो आहे त्यामुळे तुझे प्रेम देऊन तु
माझी समजूत काढावी.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग