माता वाट पाहे नामा अ
1256.
माता वाट पाहे नामा अजुनी का नये | देखोन विठ्ठल काय भुलला तेथे ॥१॥
ऐसे मज पाहता हेचि घडे साचे | विंठ्ठली मनः त्याचे गुंतले असे ॥२॥
काय सांगो माय जाल देवळासी | जपतो अहर्निशी विठ्ठल नामा ॥३॥
तहान भूक कांही आथीचना मनी | विठ्ठल विठ्ठल म्हणोनि हाचि छंद ॥४॥
नेणो कवण्या गुणे भूलविले याते | विंदान आमुते न कळे कांही ॥५॥
दिशा अवलोकिता प्राण नव्हे निश्चित | बहुत क्षुधाक्रांत जाली असे ॥६॥
तेथून लवलाहे धांवत निघाली | महाद्वारा आली पहावया ॥७॥
तो तंव पांडुरंगा सन्मुख देखिला | चित्रींचा लिहिला पुतळा जसा ॥८॥
नाही चळणवळण तटस्थ नयन | केले निबलोण योगिजनी ॥९॥
ते देखोनि मातेसी थोर द्वेष आला | क्रोधे आसुंडिला करी धरुनि ॥१०॥
तंव प्रेंताचियेंपरी पडिला भ्रूमीवरी | देखोनि सुंदरी रुदना करी ॥११॥
मग उचलोनि ओसंगा धरिला पोटासी | म्हणे कारे रुसलासि सांग नाम्या ॥१९॥
निढळासी निढळ मिळवूनि ते रडे | माझिया कानाडे काय जाले ॥१३॥
दृष्टि उघडुनी नामा भोंवते जंव पाहे | तंव सन्मुख माय देखियेली ॥१४॥
येरी उचलोनि दिंधले आलिंगन | जाले समाधान तयेवेळी |॥१५॥
सुर्हुदे डे सोयरी सकळिके मिळोनि | करिती झाडणी नानापरी ॥१६॥
माउली नव्हेसि तू वैरिणी जाण | माझ्या केशवाची खूण अंतरली ॥१७॥
शस्त्रेविंण वध केला अवचिता | जीव तळमळता जाऊ पाहे ॥१८॥
|आता परतोनी माझी वाट पाहसी | साच रिपू होसी तरी जाण ॥१९॥
नामा म्हणे माते जाई हो येथुनी | मज जाई निरवूनि विठोबासी ॥२०॥
