जनिता जीवविता सर्वज्
1264.
जनिता जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळिता | आडणी सांभाळिता चराचरी ॥१॥
एक पांडुरंग दुजा नाही चांग | म्हणुनि याचा संग धरिला माते ॥२॥
माझी तुज कांही करणे नलगे चिंता | मज आहे पोसिता पांडुरंग ॥३॥
हा शरणागतांचा जाणे कळवळा | हा पै कळिकाळा पाहो नेदी ॥४॥
केले कोटिवरी न मानी अपराध | हे पै साजे ब्रीद पांडुरंगा ॥५॥
आम्ही आपुल्या सुखे असो भलत्या ठायी | प्रीति तया पायी जडली असे ॥६॥
तेणे उपकारे न विसंबे क्षण | हाती सुदर्षन घेऊनि उभा ॥७॥
जाणता नेणता राम गावो गीती | जन्माची विश्रांति होय जेणे ॥८॥
ऐसी जिंवलग होईल केंचे आन | संचला परिपूर्ण सर्वांठायी ॥९॥
इष्टमित्र बंधु सज्जन सोयरा | माझिया संसारा हाचि एक ॥१०॥
नामा म्हणे माते मज न चले मोहोपिसे | तुम्हांसि मज ऐसे होईल काई ॥११॥
