जन्मा येऊनिया पराक्र
1260.
जन्मा येऊनिया पराक्रम करी । काम होसी संसारी भूमिभारा ॥१॥
सुदैवाची लेंकरे वर्तताति कैसी । तू मज जालसि कुळक्षय ॥२॥
कैसी तुज नाही कौकिकाची लाज । हेंचि थोर मज नवल वाटे ॥३॥
अभिमान अहंता सांडुनिया जगी । नाचतोसि रंगी गीत गाता ॥४॥
तुजविण लोक अज्ञान नसती । क्षण न विसंबती मायबापाअ ॥५॥
पुत्र आणि कलत्र घराची विपत्ति । तुज अभाग्याचे चित्ती पंढरीनाथ ॥६॥
याते भजती त्याचे न उरेचि कांही । हाचि देव पाही घरघेणा ॥७॥
जयाचे खुंटे तो लागे याच्या पंथे । तुजसि शिकविते म्हणोनिया ॥८॥
गोणाई म्हणे नाम्या हे नव्हे पै भले । विठोबाणे केले आपणा ऐसे ॥९॥
