भक्ताचिये भुके ।
1241.
भक्ताचिये भुके ।
प्रेम वागविसी भातुके ॥१॥
घालूनिया निज मुखी
एकाएकी करिसी सुखी ॥२॥
पुरवुनी आळी ।
घेसी कडिये तेचि काळी ॥३॥
निळा म्हणे बापमाय ।
एका अंगे दोन्ही होय ॥४॥
1241.
भक्ताचिये भुके ।
प्रेम वागविसी भातुके ॥१॥
घालूनिया निज मुखी
एकाएकी करिसी सुखी ॥२॥
पुरवुनी आळी ।
घेसी कडिये तेचि काळी ॥३॥
निळा म्हणे बापमाय ।
एका अंगे दोन्ही होय ॥४॥