कापड घेऊनी जाय बाजार
1262.
कापड घेऊनी जाय बाजारासी | गोणाई नाम्यासी शिकवितसे ॥१॥
लोकांचे हे पुत्र संसार करिती | आमुची फजिती केली नाम्या ॥२॥
नाम्या विठोबाचा संग नव्हे बरा | मैद हा खरा गळाकांटू ॥३॥
याचे संगतीने संसार जाळावा | भोपळा हा घ्यावा भीक मागू ॥४॥
नको संग धरु नाम्या ऐक गोष्टी | गोणाई हनुवटी धरूनी सांगे ॥५॥
