पशु आणि पक्षी तरले स
1248.
पशु आणि पक्षी तरले स्मरणे । तो तुम्हा कारणे उपेक्षीना ॥१॥
धरुनि विश्वास आळवावे नाम । सदगद ते प्रेम असो द्यावे ॥२॥
सुखदुःख कोटी येती आणि जाती । नामाविण विश्रांती नाही जगी ॥३॥
एका जनार्दनी नामाचा प्रताप । नुरेची तेथे पाप वोखदासी ॥४॥
